
वीज ग्राहक वीजबिल अनामत रक्कम भरणार नाहीत, माजी आमदार राजन साळवी यांचा इशारा
महावितरण कंपनीने आपल्या ग्राहकांना वाढीव अनामत रक्कम भरण्यासाठी तगादा लावला आहे. ती रक्कम ग्राहकांना विनाकारण असून तो भुर्दंड ग्राहकांना लावू नये, असा इशारा देवून कोणीही रक्कम भरणार नसल्याचा इशारा महावितरण कंपनीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांनी दिला आहे.पावसाळा व नुकत्याच झालेल्या वादळामुळे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात उदभवलेल्या समस्येबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे महावितरणच्या अधिकार्यांसोबत भेट घेतली. येणार्या पावसाळ्यातील समस्येबाबत माहिती घेवून चर्चा केली. तसेच नुकत्याच झालेल्या वादळामुळे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात खूप ठिकाणी प्रचंड नुकसान झाले. त्याबाबत आढवा घेवून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या www.konkantoday.com.