
लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन
आपल्या कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे. त्यासाठी चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू हे अभियान हाती घेण्यात आले आहे. लाचलुचपत विभाग रत्नागिरीने नागरिकांनी पोलीस उपअधिक्षक सुशांत चव्हाण (९८२३२३३०४४), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी, पोीस निरीक्षक अनंत कांबळे (७५०७४१७०७२), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय संपर्क क्र. ०२३५२-२२२८९३, टोल फ्री क्र.-१०६४ तसेच मेल रललीरींपरसळीळऽसारळश्र.लेा येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.www.konkantoday.com