
रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान नुतनीकरणानंतर १५ ऑगस्टला नागरिकांसाठी खुले होणार
रत्नागिरी येथे ५ कोटी रूपये खर्चून लोकमान्य टिळक जन्मस्थानाचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष भेट देवून राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. ही वास्तू १५ ऑगस्ट २०२४ रोजी रत्नागिरीकरांसाठी खुली होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.टिळक जन्मस्थानाच्या येथील सार्या समस्यांची दखल पालकमंत्री उदय सामंत यांनी घेत गतवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी केलेल्या घोषणेनुसार रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थानाच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. रत्नागिरी नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभिकरणासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या कामाचे भूमिपूजन करून मंत्री सामंत यांनी गतवर्षी या सुशोभिकरणाचे लवकरात लवकर काम पूर्ण करा, अशा सूचना संबंधितांना दिल्या होत्या.आता या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. स्मारकाच्या इमारतीवरील छताची पूर्णपणे दुरूस्ती करण्यात आली आहे. मात्र पूर्वीचा जुना असलेल्या छताचा साज आज नव्याने करताना त्याची रचना पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. आतील छपराचे लाकडी काम करण्यात आले आहे. अंतर्गत परिसरात सुसज्ज असे प्रसाधनगृह, फुटपाथ, मिनी संवाद कट्टा, संग्रहालय, सभागृह अशी कामेही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे या स्मारकाचा परिसर खर्या अर्थाने सुशोभित केला जाणार आहे.www.konkantoday.com