रत्नागिरी नजिकच्या शिरगाव तिवंडेवाडी येथील तरूणीचा शॉक लागून मृत्यू
रत्नागिरीनजिकच्या शिरगाव तिवंडेवाडी येथील एका तरूणीला इलेक्ट्रीक बोर्ड उचलून ठेवत असताना जोरदार शॉक लागला. बेशुद्ध अवस्थेत तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.पोलिसांच्या माहितीनुसाार अश्विनी अनंत सनगरे (२२, रा. शिरगाव तिवंडेवाडी) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव आहे. ही घटना २५ मे रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. शनिवारी सकाळी ती घरात असताना इलेक्ट्रीक बोर्ड उचलून ठेवत होती. तिच्या हातांना शॉक लागून ती बेशुद्ध पडली. नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी अश्विनीला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.www.konkantoday.com