मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी प्रवासी बस रस्त्याच्या बाजूला कलंडून झालेल्या अपघातात २१ प्रवासी जखमी

मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी असणाऱ्या पाली बावनदी पर्यायी बाह्यमार्गावर काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी प्रवासी बस रस्त्याच्या बाजूला कलंडून झालेल्या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले आहेत हे सर्व प्रवासी मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेले होते ते परतत असताना हा अपघात होऊन जखमी झाले आहेत.या अपघाताबाबत पाली ग्रामीण रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की, काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पाली ते बावनदी या मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी असणाऱ्या अरुंद रस्त्यावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी प्रवासी आराम बस क्रमांक एम एच ४३ बीपी ७०९७ घेऊन चालक अजय धनंजय दास,२९ रा. कोपरखैरणे सेक्टर १९ नवी मुंबई जात असताना निवळी शेलटेवाडी नजीकच्या वळणावर प्रवासी बस आली असता रस्त्याच्या बाजूला खोलदरीत कलंडून झालेल्या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले आहेतwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button