
आमदार राजन साळवी यांच्या पुढाकाराने पुरात गाडीत अडकलेल्या २८ प्रवाशांना सुखरूप घरी पोहोचवले
गेल्या चार दिवसांपासून चिपळूण तालुक्यासह परिसरात वाशिष्ठी नदीच्या महाप्रलयाने धुमाकूळ घातला आहे. या महाप्रलयात दोन दिवसांपासून वालोपे (ता. चिपळूण) येथे अडकून पडलेल्या प्रवाशांच्या मदतीला आमदार राजन साळवी धावून गेले. साळवी यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांच्याशी संपर्क साधून उपलब्ध करून दिलेल्या एसटी गाडीतून राजापूर मतदारसंघातील तब्बल २८ प्रवाशांनी सुखरूपपणे घर गाठले.
वालोपे येथे अडकून पडलेल्या प्रवाशांना गाडी उपलब्ध करून देण्याची सूचना राजेशिर्के यांनी पुरूष व महिला यांचा समावेश असलेल्या २८ प्रवाशांना तत्काळ एसटी उपलब्ध करून दिली. या गाडीमधून वालोपे येथे अडकून पडलेले प्रवासी सुखरूपपणे राजापूर येथे आले. या प्रवाशांना मदत करण्यासाठी चिपळूण येेथे आलेले लांजा येथील शिवसेना शहरप्रमुख गुरूप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सचिन लिंगायत, मोहन तोडकरी आदींनी प्रवाशांची पाणी व बिस्किटाची सोय केली.
www.konkantoday.com