चिपळूण तालुक्यातील कौटांबा येथील तांबी नदीत बुडून तरूणाचा मृत्यू

चिपळूण तालुक्यातील कौटांबा येथील तांबी नदीत २० वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना २ दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहिल सचिन मोहिते (२०, पोसरे) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल हा जन्मापासून मानसिक रूग्ण होता. त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी साहिल याचा चुलत भाऊ सुशिल सुनील मोहिते व वाडीतील सुधाकर लक्ष्मण मोहिते असे कौटांबा येथील तांबी नदीच्या पायात म्हशी धुवत होते. त्याचवेळी साहिल हा नदीच्या किनार्‍यावर उभा राहून सुशिल यास मी तुमच्याजवळ येवू का, असे विचारत असताना त्यास सुशिल याने पाणी बरेच खोल आहे, येवू नकोस, असे सांगितले. मात्र तरीही साहिल हा नदीच्या पाण्यात उतरत असताना त्याचा पाय घसरून तो नदीच्या पाण्यात पडून बुडाला. त्यानंतर तो दिसेनासा झाला. यावेळी गावातील लोकांनी त्याचा नदीत शोध घेत असताना त्याचा मृतदेह आढळून आला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button