गोवा महामार्गावर नागोठणेदरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

गोवा महामार्गावर नागोठणेदरम्यान रविवारी दोन्ही बाजूला लागलेल्या लांबच लांब रांगामुळे चाकरमानी पर्यटकांसह अन्य प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले. वाहतूक सुरळीत करताना महामार्ग वाहतूक पोलिसांची पुरती दमछाक झाली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचे सायंकाळी उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.उन्हाळी सुट्टीसह विकेंडमुळे गावी येणारे चाकरमानी आणि पर्यटकांचा ओघ कायम आहे. विशेषतः कोकणात दाखल होणार्‍या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. रविवारी महामार्ग वाहनांच्या रेलचेलीने पुरता गजबजला होता. यावेळी नागोठणेदरम्यान मोठी वाहतूक कोंडी पहावयास मिळाली. चाकरमान्यांसह पर्यटकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. तब्बल सहा ते सात कि.मी. अंतरापर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा वेळ वाया गेला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button