
खेड शहरातील जगबुडी व नारिंगी नदीच्या गाळ उपशासाठी २.८४ कोटी निधीची मान्यता
खेड शहरातील जगबुडी व नारिंगी नदीला येणारे पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून व्यापार्यांची अपरिमित हानी होत असते. या प्रश्नी आमदार योगेश कदम यांनी गंभीरपणे लक्ष घालत केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर गाळ उपसण्यासह बेटे काढण्यासाठी २ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. तातडीने गाळ उपसण्याचे आदेश पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी अलोरे येथील कार्यालयाला दिल्या आहेत. यामुळे खेडवासियांना पुराच्या पाण्यातून मुक्ती मिळणार असून जगबुडी नदीपात्रही मोकळा श्वास घेणार आहे.शहरातील जगबुडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात मुसळधार अतिवृष्टी झाल्यानंतर पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून व्यापार्यांची अपरिमित हानी होत असते. www.konkantoday.com