खेड रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू

खेड रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून बसस्थानकाच्या बाहेरील सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्ता कॉंक्रीटीकरणासह अंतर्गत कामांनी वेग घेतला आहे. पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. या ठिकाणी रिक्षा व्यावसायिकांसाठी स्वतंत्र थांब्याची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय वेगवेगळ्या मार्गाने स्वतंत्र वाहने मार्गस्थ होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेतही सुरळीतपणा येणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button