करन्सी एक्सचेंजच्या बहाण्याने महिलेची ४६ हजारांची ऑनलाईन फसवणूक
करन्सी एक्सचेंजच्या बहाण्याने महिलेची दोघांनी मिळून सुमारे ४६ हजार ७०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरा नुरा व राहुल पांचाळ अशी गुन्हा दाखल करण्याात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी २९ एप्रिल सायंकाळी पाच ते २५ मे २०२४ ला सायंकाळी ६ या कालावधीत कुवारबाव येथे घडली. अलंकिती सुरेंद्रकुमार श्रीवास्तव (२९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही संशयितांनी मिळून फिर्यादी महिलेला करन्सी एक्सचेंजसाठी २ हजार, १० हजार ३००, १५ हजार ३००, १९ हजार १०० रुपये असे वेळोवेळी एकूण ४६ हजार ७०० रुपये आपल्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अलंकिती श्रीवास्तव यांनी पैसे भरले. परंतु संशयितांनी त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांनी भरलेली रक्कमही परत न करता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com