
वादळामुळे नुकसान झालेल्यांना पंचनामे करून लोकांच्या तोंडाला पाने न पुसता भरपाई किती देणार ते जाहीर करा -शौकत मुकादम
पाऊस, वादळ वार्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, गोठे, हापूस आंब्याची कलमे, काजू बाग, केळीच्या बागायती असे अनेक प्रकारचे नुकसान जिल्ह्यामध्ये झाले आहे. शासनाने कृषि अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व संबंधित अधिकार्यांना तातडीने पंचमाने करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करून संबंधित नुकसानग्रस्त व्यक्तींच्या तोंडाला पाने पुसू नका, नुकसान भरपाई किती देणार? हे तातडीने शासनाने जाहीर करावे, अशी मागणी माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे व तसे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. www.konkantoday.com