
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ पासून माकडांची प्रगणना कामाला सुरूवात होणार
माकड, वानर यांचा शेतकर्यांना होणारा उपद्रव, शेतीचे मोठे नुकसान या पार्श्वभूमीवर वनखात्यामार्फत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ ते ३० मे पर्यंत वानर व माकड यांची संयुक्त प्रगणना मोहीम राबवण्यात येणार ाहे. या मोहिमेत गावातील युवक, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जाणार आहे. प्रगणनेच्या कामी युवक, स्वयंसेवी संस्थांसह कृषी विभाागालाही सहभागी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या मोहिमेसाठी वनखात्याच्यावतीने युवकांना एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) यांच्यामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील उपद्रवी वानर व माकड यांची प्रगणना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे.या मोजणीसाठी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी स्थानिक ग्रामस्थ यांची मदत आवश्यक आहे. यासाठी इच्छूक नागरिकांना मोजणीपूर्वी एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच मोजी कामात सहभागी नागरिकांना वनविभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. www.konkantoday.com