![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/05/images-1-20.jpeg)
रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला(नॅक) ॲक्रिडेशन ”ब” श्रेणी प्राप्त
रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती मंडळाचा (नॅक) ॲक्रिडेशन ”ब” श्रेणी प्राप्त झाली आहे. नुकतीच ”नॅक”च्या त्रिसदस्यीय समितीने या महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली होती.या समितीमध्ये टीमचे प्रमुख म्हणून बेंगलोर विद्यापीठाच्या जिओ इंफोर्मेटिक्स विभागाचे प्राध्यापक अशोक हंजगी, टीमचे समन्वयक म्हणून जादवपूर (कलकत्ता) विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक रूप कुमार बर्मन आणि टीमच्या सदस्या म्हणून कोंबा (गोवा) येथील विद्या विकास मंडळाच्या श्री दामोदर एज्युकेशन कॅम्पसच्या प्राचार्या डॉ. प्रीता मल्या सहभागी झाल्या होत्या. १७ व १८ मे या दोन दिवसांच्या भेटीत या टीमने महाविद्यालयात राबविलेल्या अभ्यासक्रम, अभ्यासक्रमपूरक व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रमांचा (सामाजिक सहभागाचा), संशोधन, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तसेच महिला विकास कक्ष याविभागांसह प्रशासकीय, क्रीडा, सांस्कृतिक कामकाजाचा आढावा या समितीने घेतला होता. संस्थेला ”ब” श्रेणी प्राप्त झाल्याचे समजल्यानंतर प्रतिक्रिया देताना संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये म्हणाले, नॅकचे ॲक्रिडेशन मिळणे हे नवनिर्माण संस्था आणि महाविद्यालय यासाठी अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. महाविद्यालयाला नॅकचे २.४६ गुण प्राप्त झाले आणि बी दर्जा मिळाला.www.konkantoday.com