
रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ५३८ महसुली गावे पब्लिक ऍलर्ट सिस्टीमने जोडणार
गेल्या दोन वर्षांच्या तुललनेत आपत्ती व्यवस्थापनामध्ये जिल्हा प्रशासन अधिक सजग, मजबूत झाले आहे. म्हणून आपत्तीबाबत तत्काळ माहिती मिळविण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ५३८ महसुली गावे पब्लिक ऍलर्ट सिस्टीम या यंत्रणेने जोडण्याचा प्रस्ताव पालकमंत्री ना. उदय साामंत यांना दिली आहे. जिल्हा नियोजनमधून त्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. आपत्तीच्यादृष्टीने जिल्ह्याातील शहरेदेखील सीसी टीव्हीने जोडण्याचा नवा प्रस्ताव आहे. त्याचे नियंत्रण कत्र पोलीस नियंत्रण कक्षात ठेवण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. www.konkantoday.com