बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 बाळांचा मृत्यू, अनेक जखमी

दिल्लीच्या विवेक विहार इथल्या एका बेबी केअर सेंटरला शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत 7 लहान बाळांचा यात होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला रात्री साडेबाराच्या दरम्यान मिळालीत्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थाळावर गेल्या. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरू केले. त्यात 12 लहान बाळांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यातील 7 बाळांचा मृत्यू झाला आहे. जखमी 5 बाळांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ईस्ट दिल्ली एडवांस्ड केअर हॉस्पिटल मध्ये या मुलांना दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button