बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या मचाणावरील वन्य प्राणी गणनेत निसर्गप्रेमींना २०० हून अधिक वन्यप्राण्यांचे दर्शन

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या निसर्गानुभव कार्यक्रम अंतर्गत झालेल्या मचाणावरील वन्य प्राणी गणनेत निसर्गप्रेमींना २०० हून अधिक वन्यप्राण्यांचे दर्शन घडले.२३ मे रोजी निसर्गानुभव कार्यक्रमानिमित्त निवडक ८१ निसर्गप्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण, कोयना, कुंभार्ली घाट, बामणोली, कांदाट, चांदोली, ढेबेवाडी, हेळवाक आणि आंबा या वन परिक्षेत्रातील जंगलातील ८१ मचाणावर बसून अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी मिळाली. ढगाळ वातावरण, दाट धुके व पाऊस असूनसुद्धा अपुऱ्या प्रकाशात झालेल्या या गणनेत बिबट्यासह एकूण १६ सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे, तसेच ११ वन्य पक्षी, परीसृप प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले आहे.निसर्गानुभव कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी याबरोबरच नगर, पुणे, मुंबई येथूनही निसर्गप्रेमींनी हजेरी लावली होती. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button