धमकी मिळालेले खेड येथील पत्रकार चंद्रकांत बनकर यांना पोलीस संरक्षण देण्याची जिल्ह्यातील पत्रकारांनी केली मागणी
खेडमधील मूळगाव येथील जांभा खाणीवर महावितरणने लाखो रुपयांच्या वीज चोरी प्रकरणी केलेल्या कारवाईची बातमी केली म्हणून खेडमधील पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी फोन वरून धमकावणार्या अज्ञात व्यक्तींवर खेड पोलीस ठाण्यात धमकीचा, तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेला दोन दिवस झाले, तरीदेखील धमकविणार्या आणि धमकी द्यायला लावणार्या कोणाचीच नावे उघड झाली नसून पोलिसांकडून अद्याप कोणालाही ताब्यात घेतले गलेले नाही. खेडमधील पत्रकार चंद्रकांत बनकर यांनाा पोलीस संरक्षण देण्याची मागणी चिपळुणातील ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पत्रकारांकडून केली जात असून संपूर्ण जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी पोलीस ठाण्यात निवेदनदेखील देण्यात आली आहेत.www.konkantoday.com