
चिपळुणात वादळी पावसाचा फटका, ५७ गावात ४९४ घरांची पडझड
गेल्या १० दिवसात सहावेळा झालेल्या वादळी पावसाचा फटका चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागाला बसला असून ५७ गावे बाधित झाली आहेत. बुधवारी दुपारच्या वादळी पावसात सावर्डे, डेरवणसह १४ गावांत २६५ घारांचे अंशतः नुकसान झाले आहे. ६ दिवसात एकूण ४९४ घरे, ११ गोठ्यांची पडझड झाली असून महावितरणलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सर्व मिळून तीन कोटीहून अधिकचे नुकसान हे तालुक्यात झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार व महावितरणने दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.www.konkantoday.com