
खेड येथील रत्नागिरीचा हापूस आयर्लंडमध्ये, आयरिश नागरिकांना आंब्याची भुरळ
खेडमधील सुपुत्राच्या कल्पनेतून रत्नागिरीचा हापूस आंबा आयर्लंडमध्ये पोहोचला असून आयरिश नागरिकांना रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चांगलीच भुरळ पडली आहे. खेडचा सुपुत्र अरूण प्रभू याच्या प्रयत्नाने रत्नागिरीचा हापूस थेट आयर्लंडमध्ये पोहोचला आहे.खेडचा सुपुत्र अरूण राजन प्रभू याने यापूर्वीच आयर्लंड येथे स्पाईस इंडिया या रेस्टॉरंटची निर्मिती केली. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय नव्हे तर आयरिश नागरिकांना आपल्या चवीची भुरळ चालत अल्पावधीतच आयर्लंडमध्ये स्पाईस इंडिया हे रेस्टॉरंट प्रसिद्ध झाले. अरूण प्रभू यांने गेली दहा वर्षे गोग्रीन एक्सपोर्ट कंपनीचे सचिन कदम यांच्या माध्यमातून एक संकल्पना अंमलात आणली आहे. कोकणातील रत्नागिरीचा हापूस आंबा आयर्लंड येथे आस्वाद मँगो या नावाने अरूण प्रभू यांनी विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. आतापर्यंत तेथील नागरिकांनी ५००० आंब्यांची खरेदी केली असून आंब्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. www.konkantoday.com