सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या खेड निमशासकीय विश्रामगृह इमारतीचे काम रखडलेलेच

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या डाकबंगला येथील शासकीय विश्रामगृहाची जुनी इमारत पाडून ५ वर्षांचा कालावधी लोटून देखील अजूनही इमारतीचे काम रखडलेलेच आहे. गेल्या ५ वर्षापासून संथगतीने काम सुरू असल्याने विश्रामगृहात वास्तव्यास येणार्‍यांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.तालुका दौर्‍यावर येणार्‍या मंत्र्यांसह, खासदार, आमदार, विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या निवास व्यवस्थेसाठी डाकबंगला येथे बर्‍याच वर्षापूर्वी शासकीय विश्रामगृहाची उभारणी करण्यात आली होती. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्रामगृहामुळे मंत्री, आमदार व विविध वरिष्ठ अधिकार्‍यांना बैठका घेणे सर्वच दृष्टीने सोयीचे ठरत होते. मात्र शासकीय विश्रामगृहाची जागा बैठकांसाठी अपुरी पडून अधिकार्‍यांना बाहेरच उभे रहावे लागत होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button