रत्नागिरी येथे लावलेली सीबँड डीब्ल्यूआर यंत्रणा छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा घाट
हवामानाचा अचुक अंदाज घेण्यासाठी रत्नागिरी येथे लावलेली सीबँड डीब्ल्यूआर यंत्रणा छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा विचार सरकारी यंत्रणाने सुरू केला आहे. डॉपलर वेदर लडार ही यंत्रणा अधिक अचूक अंदाजासाठी वापरण्यात येते.वृत्तसंस्थांनी माहिती दिली आहे की, स्वतंत्र हवामान विश्लेषक किरण जोहारे यांनी या संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला. ते म्हणाले, डॉपलर वेदर रडार यंत्रणेची मागणी पूर्ण करण्याचा विचार सरकारी अधिकार्यांनी केला आहे. वरिष्ठ हवामान अधिकार्यांनी सीबँड डॉपलर रडार रत्नागिरीहून मराठवाड्यात हलविण्याविषयीची माहिती त्यांना दिली. वरिष्ठ अधिकार्यांनी त्याची पुष्टी केली आहे. मात्र असे रडार हलवणे आक्षेपाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोकणात फयान, निसर्ग आणि तोक्तेसारखी जबरदस्त चक्रीवादळे येवून गेली. त्यामध्ये कोट्यावधींची हानी झाली. चक्रीवादळाला नियंत्रित करू शकेल अशी कोणतीही उपाययोजना उपलब्ध नाही. पूर्वसूचनेनंतर काळजी घेणे एवढे माणसाच्या हाती आहे. www.konkantoday.com