रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघा तर्फे वधूवर मेळावा संपन्न
भंडारी समाजाला गेली २ वर्षे प्रतिक्षेत असलेला प्रत्यक्ष वधू वर सूचक मेळावा रत्नागिरीतील ८० फुटी हायवे येथील गगनगिरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. मागील कार्यकारिणीने समाजसंघाची निवडणूक लादल्यानंतर नवीन कार्यकारिणीने नूतन अध्यक्ष श्री राजीव कीर यांच्या मार्गदर्शनाखाली ४७ भंडारी वस्तींच्या गावांमध्ये गावभेट कार्यक्रम आयोजित करीत वधू वरांची नोंदणी करून घेतली आणि तब्बल दोन वर्षांनी समाजाला आवश्यक असणारा वधुवर परिचय मेळावा संपन्न झाला . भंडारी समाजसंघामध्ये १० वर्षांपूर्वी उपाध्यक्षा ॲड सौ प्रज्ञा तिवरेकर यांच्या संकल्पनेतून वधू वर सूचक मंडळाची स्थापना करण्यात आली. अत्यंत अल्प दरात नोंदणी करून , वधू वरांचे लग्न जुळेपर्यंत त्याच नोंदणी मध्ये ही सेवा दिली जाते . कोणतेही नूतनीकरण शुल्क आकारले जात नाही त्यामुळे मोठ्याप्रमाणावर नोंदणी झाली . मेळाव्याचे उद्घाटन प्रसिध्द उद्योजक श्री प्रसन्नाशेठ आंबुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष श्री राजीव कीर, उपाध्यक्ष श्री कांचन मालगुंडकर, मेळावा प्रमुख सौ प्रज्ञा तिवरेकर, निवृत्त तहसीलदार राजेंद्र बिर्जे, दिलीप रेडकर, प्रकाश मांजरेकर, अमृता मायनाक, सौ दयाताई चवंडे, सौ स्वाती मयेकर, आप्पा वांदरकर, बाबू मयेकर आदी उपस्थित होते. या मेळाव्याला वधू वरानी व पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली . जुन्या नोंदणी केलेल्यांना थेट प्रवेश देण्यात आला. नवीन नोंदणी करून आलेल्या वधुवरा सहीत मोठ्या एलईडी स्क्रिनवर फोटो व बायोडाटा सहीत माहिती दाखविण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , संतोष मयेकर,ऍड प्रज्ञा तिवरेकर, चंद्रहास विलणकर व अमृता मायनाक यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय हातीसकर, दीपक तोडणकर,आबु भाटकर, महेंद्र सुर्वे, स्वाती मयेकर, प्रशांत मयेकर, मुकुंद विलणकर,नेहा नागवेकर, विजय भाटकर, प्रशांत मयेकर, निलेश बिर्जे, विजय बिर्जे, अनंत भाटकर, दीपक तिवरेकर यांनी मेहनत घेतली. जेवण नाष्टा गणेश धुरी, प्रणित शेटे यांनी एलईडी स्क्रीन उपलब्ध केली , नंदू मोरे यानी साऊंड सर्व्हिस दिली सर्वांचे आभार सचिव चंद्रहास विलणकर यांनी मानले.www.konkantoday.com