रत्नागिरी जिल्ह्यात वन्य प्राण्यांमुळे नुकसान, २४ लाखांच्या भरपाईचे वाटप
जिल्ह्यात सह्याद्रीच्या पट्ट्यात होत असलेल्या जंगली तोडीमुळे मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी हे नागरी वस्तीमध्ये घुसून शेतीचे नुकसान करून, पाळीव जनावरे, मनुष्य यांच्यावर हल्ले करीत आहेत. मागील वर्षभरात सुमारे २४ लाखांची नुकसान भरपाई रत्नागिरी, राजापूर, लांजा व संगमेश्वर तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आले आहे. एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २४ दरम्यान रत्नागिरी, राजापूर, लांजा व संगमेश्वर तालुक्यांमध्ये २२० हून अधिक घटना घडल्याच्याा नोंदी वनविभागाकडे झाल्या आहेत. सह्याद्रीच्या पट्ट्यातील काही भागांमध्ये होत असलेली जंगल तोड, वन्यप्राण्यांच्या शिकारीमुळे भक्ष्याच्या शोधात हिंस्त्रप्राण्यांसह गवा, काळवीट सारखे प्राणी आता मानवी वस्तीवर आसपास दिसून येवू लागले आहेत. काळवीट, डुक्कर, गव्यांसारखे प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. www.konkantoday.com