मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बस स्थानकाच्या प्रवेश द्वारासमोर चिखलाचे साम्राज्य
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बस स्थानकाच्या प्रवेश द्वारासमोर चिखलाचे साम्राज्य पसरले असून पहिल्याच पावसात चिखलाच्या साम्राज्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. चौपदरीकरणाचे काम करत असताना गटाऱ्यांची दुरुस्ती न केल्याने तसेच मोठे खोदकाम केल्याने बस स्थानकात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पडझड सुरू झाली असून रस्त्यावर चिखलाच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पहिल्याच पावसात संगमेश्वर बस स्थानकासमोर चिखल साचला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर बस स्थानक हे महत्वाचे बस स्थानक आहे. मुंबई ,गोवा आदी लांब पल्याच्या गाड्यां या बस स्थानकातून सुटतात. लांब पल्याच्या गाड्यांसाठी प्रवासी वर्ग या ठिकाणी येत असतात . त्यांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.www.konkantoday.com