मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने चुकीच्या दिशेने चालवित असल्याने अपघाताचा वाढता धोका
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने उजव्या बाजूनी चालवण्यात येत असल्याने लहान वाहनांना जीव धोक्यात घेवून ओव्हरटेक करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांसमोर अशा चुकीच्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने पोलिसांचा या वाहतुकीला आशीर्वाद आहे का? असा सवाल विचारला जात आहे.महामार्गावर ट्रक, ट्रेलर इत्यादी अवजड वाहने उजव्या बाजूंनी चालवण्यात येतात. यामुळे छोट्या कार, मोटारसायकल, रिक्षा आदी वाहनांना जीव धोक्यात टाकून डाव्या चुकीच्या बाजूनी ओव्हरटेक करावा लागत आहे. www.konkantoday.com