मतदार यादीतील नावे वगळण्याच्या तक्रारीबाबत मतदारांनी आतापासूनच जागरूक राहणे आवश्यक
लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडल्यानंतर राज्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदानादिवशी ज्या काही त्रुटी आढळल्या त्यावर पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. मतदानादिवशी अनेकांनी नाव वगळण्यात आल्याबाबत तसेच नाव गायब होण्याबाबत तक्रारी केल्या. मात्र मतदानादिवशी नाव शोधण्यापेक्षा अगोदर नाव शोधण्याचा सल्ला अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिला. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण होताच राज्य निवडणूक आयोगाकडून सहसचिव तसेच महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्यातील मतदान प्रक्रियेतील विविध मुद्यांवर भाष्य केले.www.konkantoday.com