पावसाळी हंगामात जलयानांना समुद्रात जाण्यास प्रतिबंध
रत्नागिरी, दि. 25 (जिमाका) : पावसाळी हंगामात सुरक्षिततेच्या कारणास्तव महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारितील सर्व बंदर कार्यालयांना समुद्रात जलयाने घेऊन जाण्यास दि. २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जलयानधारकांनी आपली जलयाने समुद्रात घेऊन जाऊ नये, असे आवाहन मुंबई महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रविण एस. खरा यांनी केले आहे.