पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
मुंबई उच्च न्यायालयाने पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रथमदर्शनी आंबेरकर या प्रकरणात गुंतलेला असू शकतो, असा निष्कर्ष काढून अर्ज निकाली काढण्यात आला.हे प्रकरण उच्च न्यायालयाचे एकल खंडपीठ माधव जामदार यांच्यासमोर सुनावणीस आले. फिर्यादी पक्षाने सादर केलेल्या प्रकरणावरून दिसून येते की, अर्जदार आंबेरकर ही प्रभावशाली व्यक्ती आहे. तिचे राजकीय नेत्यांशी संबंध आहेत, अर्जदाराला जामीन मंजूर केला तर साक्षीदारांवर प्रभाव पडू शकेल. दस्तऐवजांचा विचार केला असता जामीन मंजूर करण्यास हे प्रकरण योग्य नाही, असे न्यायालयाने नमूद केले. www.konkantoday.com