
ठाकरे शिवसेनेकडून माजी मंत्री अनिल परब आणि ज.मो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने आघाडी घेतली आहे. यासाठी त्यांनी माजी मंत्री अनिल परब आणि ज.मो अभ्यंकर यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे.गेल्या 12 वर्षांपासून विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिल परब यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 2012 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर 2018 मध्ये त्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती.उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या परब यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून भूमिका पार पाडली.www.konkantoday.com