चिपळूण नगर परिषदेची पावसाळ्यासाठी यंत्रणा सज्ज
पावसाळ्यासाठी चिपळूण नगर परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात पूरबाधित म्हणून १० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे या भागांवर नियुक्त केलेली ७ पथके विशेष लक्ष ठेवून रााहणार आहेत. तसेच अपत्तीसाठी ६ बोटी, ५ होडयांसह अन्य यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ५ ठिकाणी भांगे वाजणार असून ८० पोहोणार्या तरूणांचीही गरज भासल्यास मदत घेतली जाणार आहे.शहरात जुलै २०२१ ला आलेल्या महापूर, दरवर्षी काही भागात घुसणारे पुराचे पाणी याचा विचार करून यावर्षी नगर परिषदेने मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधिक्षक अनंत मोरे यांच्या अनुभवातून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. अशा प्रकारे सज्जता केली आहे. यावर्षीच्या या आराखड्यात बाजारपेठ, पेठमाप, गोवळकोट, मुरादपूर, शंकरवाडी, मार्कंडी, चिंचनाका, वडनाका, बसस्थानक, पागमळा हे १० भाग पूरबाधित म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागांवर नियुक्त ७ पथके विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत. www.konkantoday.com