खालगाव येथील घरफोडी प्रकरणातील चोरटा निघाला उस्ताद, दागिने चोरून दुचाकीवरून केले पलायन

रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी-खालगाव येथे पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने पळवली. ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० ते २३ मे सकाळी ६ च्या सुमारास निदर्शनास आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पुण्याला गेले असताना चोरट्याने कडी-कोयंडा, कोणत्या तरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटातील व लाकडी पलंगात ठेवलेले सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. यामध्ये २० हजाराचे सोन्याचे क्वाईन, १७ हजारांचे सोन्याचे बिस्किट, ८ हजाराची कर्णफुले, ५ हजारांची नथ, ८ हजारांचे चांदीचे बिस्किट, १५ हजारांची दुचाकी, असा ७३ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला. तसेच घराच्या शेजारी उभी करून ठेवलेली दुचाकी (क्र. एमएच-०८ एई ८९३७) चोरून नेली. या प्रकरणी फिर्यादी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button