
केरळमध्ये मान्सून पूर्व पावसाचा कहर! दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!! अनेक सेवा विस्कळीत!!!
मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर आता केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. तसेच केरळमधील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.*दक्षिण केरळ चक्रीवादळाच्या प्रभावाखाली*केरळच्या किनारपट्टीपासून दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आयएमडीने पुढील दोन दिवस केरळमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. केरळच्या अनेक भागात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनला अजून एक आठवडा बाकी आहे. मात्र, त्याआधीच केरळच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एर्नाकुलम आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातले आहे. केरळच्या इतर आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.www.konkantoday.com