रत्नागिरी जिल्ह्यात आरटीईच्या ८१२ जागांसाठी ४१५ जणांची प्रवेश नोंदणी
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी उच्च न्यायालयाने शासनाचा नवीन निर्णय रद्द करून जुन्या पद्धतीनेच १७ मे पासून आरटीईची प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ८१२ जागा असून आतापर्यंत ४१५ जणांनी अर्ज दाखल केला आहे. ३१ मे ही अंतिम तारीख असणार आहे.जिल्ह्यातील नांेंदणी झालेल्या २ हजार ४३१ शाळांमध्ये यावर्षी जिल्ह्यात एकूण १२ हजार ३४५ जागांवर विद्यार्थी प्रवेश दिला जाणार होता. पण दिलेल्या ३० एप्रिलपर्यंतच्या मुदतीत केवळ ६३१ जणांनी प्रवेश नोंदणी केलेल्या अर्जांपैकी फक्त १३८ जणांचे अर्ज वैध ठरले. मंडणगड, राजापूर या तालुक्यातून एकही नोंदणी नव्हती. आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने बदल केला होता. यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलास पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. www.konkantoday.com