रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे असून, त्याठिकाणी अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणे ही प्रतिबंधित क्षेत्रे असून, त्याठिकाणी अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई करण्यात येत आहे, अशी सूचना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी दिली आहे.त्याचबराेबर नागरिकांनी नियम पाळून खबरदारी बाळगावी व सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.सर्व धरणांचे जलाशय, नदीपात्र या ठिकाणी पाण्याची खोली, साचलेला गाळ इत्यादीमुळे पाण्यात उतरल्यास दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे सर्वच जलाशय, तलाव, नदी, नदीतील पाणीसाठे याठिकाणी नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव जाऊ नये. स्थानिक नदीपात्रालगतच्या स्थानिकांनी पर्यटकांना, बाहेरील नागरिकांना पर्यटन, करमणूक इ. कारणास्तव पाण्यात उतरण्यास मनाई करावी व संभाव्य दुर्घटनांबाबत सूचित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.www.konkantoday.com