
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी यंदा आंबा वाहतुकीमध्ये पोस्टाचा सहभाग घेतला नाही
कृषी मालाची वाहतूक करण्यासाठी पोस्ट खात्याने वेगवेगळ्या योजना आखल्या होत्या. कोविड काळात रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आंबा वाहतूक यशस्वीपणे करण्यात आली होती परंतु आंबा उत्पादकांना सध्या विविध पर्याय उपलब्ध असल्याने पोस्टाच्या मदतीशिवाय आंबा व्यवहार पार पडत आहे. कोरोना काळात रत्नागिरी जिल्ह्यातून ५० टन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची वाहतूक मुंबईकडे करण्यात आली होती. तो व्यवहार यशस्वीपणे पार पडला. आंबा उत्पादकांची एक बैठक पोस्टाच्या अधिकार्यांनी घेतली होती. तथापि सध्या लागलेली रचना सुव्यवस्थित आहे असे सांगून आंबा उत्पादकांनी पोस्टाच्या सेवेचा लाभ घेण्यास अनिच्छा दर्शविली. यामुळे यावर्षी पोस्टाकडून सकारात्मकता असूनही आंबा वाहतूक घडू शकली नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.www.konkantoday.com