
महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणात पक्षाला फटका बसेल, भाजपाच्या सर्वेतच माहिती उघड
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातले मतदान पार पडले आहे. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर मतदान झाले आहे. यामुळे राज्यात आता सगळे निकालाची वाट बघत आहेत. पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.यामुळे कोणाच्या किती जागा येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात आनंदाचे वातावरण आहे. भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास नेते, पदाधिकाऱ्यांना आहे. मतदानाच्या पाचव्या टप्प्यानंतर भाजपने राज्यांचे अहवाल, सर्वेक्षण संस्थांचे अहवाल आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मोठ्या विजयाचा दावा केला आहे.यामुळे भाजप मोठा विजय होईल असा दावा केला जात आहे. भाजप नेत्यांच्या अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतात पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे. यामुळे याठिकाणी चांगल्या जागा मिळतील. पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांत पक्षाची कामगिरी चांगली असेल.महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणात पक्षाला फटका बसेल. या राज्यांत होणाऱ्या नुकसानाची भरपाई पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, तेलंगणामधून होईल अशी चर्चा आहे. यामुळे कुठे नुकसान तर कुठे फायदा असे काहीसे चित्र असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मतदानाचे सातपैकी पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. आता दोन टप्प्यांत ११४ जागांवर मतदान व्हायचं आहे.www.konkantoday.com