नवनीत राणांचा पराभव नक्की आहे-आनंदराव अडसूळ
मागची निवडणूक मी हरलो नाही, हरवलो गेलो. मी कोणाचे नाव घेणार नाही, पण योग्य वेळी घेईन” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. “नवनीत राणांचा पराभव नक्की आहे. पाच वर्षात काम केलं नाही. त्यामुळे त्या हरणार” असं आनंदराव अडसूळ म्हणाले.नवनीत राणांवर त्यांनी खूप बोचरी टीका केली. “नवनीत राणा फक्त नाटकबाजी करतात. आदिवासी महिलांमध्ये जाऊन तिथे फेर धरायचा. दहीहंडीचा कार्यक्रम करायचा. एखाद्या कार्यक्रमाला अभिनेता आणायचा. हे काम लोकांना आवडणार नाही” असं आनंदराव अडसूळ म्हणाले.“कुठल्यातरी बाईच्या घरी जायचं, तिथे पोळ्या लाटायच्या. अरे, तुझ्या घरी पोळ्या लाटना. तुझ्या घरी तू पोळी लाटली का? पोळी लाटून एकदा नवरा-मुलाला खाऊ घाल. या सगळ्या नाटकाची लोकांना भयंकर चीड आहे” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. “यावेळी, जर मी त्या ठिकाणी निवडणूक लढलो असतो, तर 100% जिंकून आलो असतो. नाटकबाजी पाहिल्यानंतर लोकांमध्ये संताप होतो” असं आनंदराव अडसूळ म्हणाले.www.konkantoday.com