
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील दुर्घटनाग्रस्त उड्डाणपुलाच्या नवीन डिझाईनला अखेर मान्यता
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील दुर्घटनाग्रस्त उड्डाणपुलाच्या नवीन डिझाईनला अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ठेकेदार कंपनीने विशेष खबरदारी घेत कामाला पुन्हा सुरूवात केली आहे. नव्या डिझाईन नुसार दोन पिलरच्यामध्ये आणखी एक पिलर उभारण्यात येणार आहे. त्याच्या खोदाईला सुरूवात झाली आहे. पहिले तयार केलेले गर्डर नष्ट केे जात आहेत. २० मीटरवरती एक पिलर उभारल्यानंतर त्यावर गर्डर टाकून कॉंक्रीटचा स्लॅब टाकण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्राप्त झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने उभारण्यात येणारा बहाद्दुरशेख नाका येथील उड्डाणपूल ऑक्टोबर २०२३ मध्ये कोसळला होता.www.konkantoday.com




