खेडशीतील विकास पवार यांना रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली ई-शिधापत्रिका वितरित

रत्नागिरी जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून ऑनलाईन पोर्टलद्वारे शिधापत्रिका सुविधा सुरू करण्यात आली आहे. खेडशी येथील विकास पवार यांना जिल्ह्यातील पहिली ऑनलाईन पोर्टलद्वारे ई-शिधिापत्रिका वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे कार्यक्षम वितरण होण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू एक पाऊल पुढे आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह, रहिवासी आता सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी न घेता त्यांच्या रेशन कार्डसाठी सोयीस्करपणे अर्ज करू शकतात. आणि प्राप्त करून घेवू शकतात. ई-शिधापत्रिकांमध्ये विशिष्ठ क्यूआर कोड दिला आहे. दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याची विशेष नोंद यामध्ये घेण्यात येणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button