कोकण, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाजः
कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसत आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. कोकण, मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहेwww.konkantoday.com