केनिया देशातीलही रेल्वेचे व्यवस्थापन व देखरेख करण्याची तयारी कोकण रेल्वने दाखवली

कोकण रेल्वेला नेपाळ देशातील डेमू रेल्वेच्या व्यवस्थापनासह देखरेखीचे कंत्राट मिळाल्यानंतर कोकण रेल्वेने आता केनियावर लक्ष केंद्रीत केले आहे. केनिया देशातीलही रेल्वेचे व्यवस्थापन व देखरेख करण्याची तयारी कोकण रेल्वने दाखवली आहे. याबाबत केनियन सरकारकडे प्राथमिक बोलणीही सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे कोकण रेल्वेचे नाव आता पुन्हा जागतिक स्तरावर पोहचणार आहे. याद्वारे कोकण रेल्वेच्या इतिहासात पुन्हा मानाचा तुराच रोवला जाणार आहे.कोकण रेल्वे प्रशासनाच्या पारदर्शक कारभारासह सगळ्याच बाबतीतील सर्वोत्कृष्ट नियोजनामुळे कोकण रेल्वेचा डंका सर्वदूर पसरला आहे. कोकण मार्गावरून धावणार्‍या सर्वच नियमित गाड्यांसह एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना प्रवाशांची भरपूर पसंती मिळत आहे. यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीतही तितकीच भर पडत आहे. विशेषतः जनशताब्दी व तेजस एक्सप्रेसच्या विस्टाडोम डब्यांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. विदेशी पर्यटकांनाही विस्टाडोम डब्यांची मोहिनी पडली असून मध्यरेल्वेचा गल्लाही दिवसागणिक वाढत आहे. कोकण मार्गावर धावणार्‍या आलिशान सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास महागडा असूनही पर्यटकांसह कोकणवासियांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button