अखेर आरजू टेक्सोल कंपनीच्या चार संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील एमआयडीसीमधील आरजू टेक्सोल कंपनीच्या विरोधात राजेश प्रभाकर पत्याने यानी १८ लाखांच्या फसवणुकीची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात केल्यानंतर पोलिसांनी या कंपनीचे संचालक प्रसाद शशिकांत फडके (रा. गावखडी), संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनी उर्फ अमर महादेव जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात राजेश प्रभाकर पत्याने यांनी तक्रार दाखल केली असून त्यांनी यात म्हटले आहे की यातील चार आरोपींनी आरजू टेक्सोल कंपनी जून २०२१ मध्ये स्थापन करून त्यामध्ये २५ हजार रुपये ते ४० लाखांपर्यंत वेगवेगळ्या डिपॉझीटच्या १५ महिने, ३६ महिने व ६० महिने या मुदतीच्या कंपनीच्या स्किम फिर्यादीना सांगुन फिर्यादी यांना खिळे बनवण्याचे ऍटोमॅटीक मशिन, खिळे बनवण्याचा कच्चा माल तसेच पुरवण्यात आलेला कच्चा माल तयार केल्यानंतर त्याबाबत मोबदला देतो असे खोटे आश्वासन देवून फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या १८ लाख रुपयांवर १६ टक्केप्रमाणे २ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा म्हणून देतो असे सांगितले तसेच १५ महिने झाल्यानंतर भरलेली डिपॉझीटची रक्कम परत करतो व तसे कंपनीमार्फत ऍग्रीमेंट करून देतो असे खोटे आश्वासन देवून फिर्यादी व त्यांच्यासारख्या इतर अनेक गुंतवणुकदारांनी सदर कंपनीत गुंतवणूक केली परंतु नंतर जादा परतावा देण्याचे खोटे आश्वासन देवून त्यांना कोणतीही रक्कम मोबदला न देता फिर्यादीची १८ लाखांची तर इतर गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या कंपनीच्या विरोधात रत्नागिरीतील अनेक गुंतवणुकदारांची फसवणूक झाली असून मात्र अद्यापही कोणी तक्रार दाखल केलेली नव्हती.www.konkantoday.com