
आठवडा बाजार येथे घराला आग , अग्नीशामक घटनास्थळी
रत्नागिरी आठवडा बाजार नजीक प्रमोदमहाजन क्रीडा संकुलाच्या मागे असलेल्या एका घराला आताच आग लागली आहे. घरातून धुराचे आगीचे लोट येत आहेत. नगरपरिषदेचा अग्नीशामक दल घटनास्थळी हजर झाले आहेत व आग विझवण्याचे काम सुरू आहे.हे घर भोसले यांचे असल्याचे कळते मात्र ही आग कशामुळे लागली ते कळू शकलेले नाही.ही आग गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
www.konkantoday.com