
रत्नागिरी जिल्ह्यातील ८३ लाखाच्या पाणी योजनांना मंत्रालय स्तरावरून मंजुरी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना राज्यातील दुष्काळग्रस्तमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचादेखील समावेश झाल्याने पाणी योजनांच्या केल्या जाणार्या कामांमधून सुटका झाली आहे. मंत्रालयस्तरावरून जिल्ह्यातील ८३ लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.सन २०२३-२४ च्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यातील प्रस्तावित योजनांना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत मान्यता मिळाली आहे. प्रस्तावित कामे कोणत्याही परिस्थितीत दि. १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असे पत्र जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहे.www.konkantoday.com