
मालवण तालुक्यातील कोळंब येथील ग्रामसेवक मारहाण प्रकरण, पाचजणांना अटकपूर्व जामीन
मालवण तालुक्यातील कोळंब येथील ग्रामसेवक प्रकाश विठ्ठल सुतार यांना कर्तव्यावर असताना कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रा. पं. सदस्या संपदा प्रभू, संजना शेलटकर व नंदा बांवकर व निखील विजय नेमळेकर यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. सर्व संशयितांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. www.konkantoday.com