भारत गौरव ट्रेनची दुसरी यात्रा पुण्याहून सुरू
भारत गौरव ट्रेनची दुसरी यात्रा पुण्याहून सुरू झाली असून, मानसखंड एक्स्प्रेस २२ मे २०२४ रोजी उत्तराखंडसाठी रवाना झाली आहे. मानसखंड एक्स्प्रेस ट्रेन दुसऱ्या फेरीत २२ मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता पुण्याहून सुटली असून, यामध्ये ३०२ पर्यटकांनी सहभाग घेतला आहे.पुण्याहून सुटल्यानंतर लोणावळा, कल्याण, वसई, वापी, सुरत, रतलाम, उज्जैन या मार्गाने २४ मे २०२४ रोजी उत्तराखंड येथील टनकपूर रेल्वे स्थानकावर मानसखंड एक्स्प्रेस पोहोचेल. IRCTC सर्व पर्यटकांना उत्तराखंडमधील कुमाऊं भागातील प्रमुख आणि अल्पपरिचित पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पॅकेज म्हणून हॉटेल, बस, टॅक्सी आदींची व्यवस्था करेल. या सेवेसाठी आयआरसीटीसीकडून २८,०२० रुपयांपासून पॅकेज सुरू होत आहेत. उत्तराखंड पर्यटन विकास परिषद आणि IRCTC यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंडच्या कुमाऊं क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी मनसखंड एक्स्प्रेस नावाची एक विशेष पर्यटक ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या यात्रा ट्रेनची पहिली फेरी २२ एप्रिल २०२४ रोजी यशस्वीरित्या चालवली गेली. यामध्ये २८० पर्यटकांनी सहभाग घेतला होता.या ट्रेनच्या पहिल्या यात्रेच्या यशस्वी संचालनानंतर आता दुसरी यात्रा फेरी ३०२ पर्यटकांसह २२ मे २०२४ रोजी पुण्याहून रवाना झाली. ही मानसखंड एक्स्प्रेस २४ मे २०२४ रोजी उत्तराखंड येथील टनकपूर येथे पोहोचेल. या यात्रेत सहभागी झालेल्या पर्यटक प्रवाशांचे रेल्वे स्थानकावर मराठी परंपरेप्रमाणे स्वागत करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने आरती करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात पर्यटकांचे स्वागत करण्यात आलेwww.konkantoday.com