बुद्ध पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात होणार पारंपरिक वन्यजीव गणना
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात होणाऱ्या निसर्गानुभव उपक्रमात (पारंपरिक वन्यजीव गणना) २३ ते २४ मेच्या रात्री सहभाग घेता येणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात जंगलातील वन्यजीवांचा वावर पाहण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांच्या हद्दीत सह्याद्री व्याघ्रप्रकल्प आहे. वन्यजीव विभागामार्फत वन्यजीव गणना होते. तेथे निसर्गप्रेमींना नियम अटी घालून निसर्गानुभव घेण्याची एका रात्रीसाठीची संधी देता येणे शक्य होते; मात्र शुल्क आकारणीवरून वन्यजीव विभागावर टीका सुरू झाली, तसेच काही मोजक्या अभ्यासकांनी खासगी व्यक्तींना गणनेत सहभागी करून घेण्यास हरकत घेतली. यामुळे वन्यजीव विभागानेही मोजकीच मचाण बांधली. परिणामी, मोजक्यांनाच संधी मिळणार आहे. वन्यजीव विभागातर्फे कोयना व चांदोली या दोन्ही अभयारण्य क्षेत्रात वन्यजीव पशुपक्षी पाहता येणार आहेत. त्यासाठी जवळपास ६०हून अधिक मचाण बांधण्यात येणार आहेत, त्या मचाणावर रात्रभर बसून जंगलवाचन करता येणार आहे.या गणनेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीने वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी ज्या सूचना देतील, त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. वास्तविक प्राणीशास्त्र, वनस्पती शास्त्राचे विद्यार्थी, निसर्गप्रेमींपर्यंत अनेक व्यक्तींना शास्त्रीय पद्धतीने जंगल अनुभवायचे असते; मात्र मोजकीच मचाण संख्या असल्याने मोजक्याच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे.www.konkantoday.com