बारावीच्या परीक्षेत अभ्यास न करता विद्यार्थ्यांचे प्रताप,मर्चंट नेव्हीमध्ये जायचेय, मला पास करा अशी उत्तरपत्रिकेतून मागणी

मला मर्चंट नेव्हीमध्ये जायचे आहे. त्यासाठी ७० टक्के लागतात. कृपया मला पास करावे, मला पास करावे ही विनंती बारावीच्या विद्यार्थ्यांनी चक्क उत्तरपत्रिकेत असे लिहून परिक्षकांमध्ये पास करण्यासाठी विनवणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारे विनंती करणार्‍या या दोन्ही विद्यार्थ्यांना नापास व्हावे लागले आहे. हा प्रकार कोकण बोर्डामध्ये घडला.बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. परीक्षेच्या वेळी होणार्‍या कॉपीच्या प्रकाराबद्दलही यावेळी चर्चा झाली. दरवर्षीपेक्षा यंदा कोकण बोर्डामध्ये कॉपीचे प्रकार वाढलेले आढळले. कोकण बोर्डात यंदाच्या बारावीच्या परीक्षेला कॉपीची ९ प्रकरणे पकडण्यात आली. विशेष म्हणजे नऊही कॉपी प्रकरणे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. सिंधुर्दु जिल्ह्यात एकही कॉपीचा प्रकार घडला नाही. मार्च २०२३ च्या परीक्षेत कॉपीचा एक प्रकार घडला होता. ती कॉपीची घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली होती. गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉपीची एकही घटना घडली नाही. यंदाच्या बारावीच्यया परीक्षेत कॉपीच्या प्रकाराबरोबरच आणखी एक आगळीवेगळी घटना कोकण बोर्डात घडली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत मला मर्चंट नेव्हीमध्ये जायचे आहे. त्यासाठी ७० टक्के गुण लागतात. म्हणून कृपया मला पास करा, अशी विनंती त्याने केली होती. दुसर्‍या एका विद्यार्थ्यानेही कृपया मला पास करावे, अशी विनंती आपल्या उत्तरपत्रिकेत केलेली आढळली. पास होण्यासाठी विनवणी करणार्‍या या दोन्ही विद्यार्थ्यांना या सर्व प्रकारामुळे नापास व्हावे लागले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button