*प्लेटलेट्स म्हणजे काय?

प्लेटलेट्स म्हणजे काय?’ हा प्रश्न अनेकांना पडतो. बरेच वेळेस आपल्याला ताप येतो, डेंगू मलेरिया टाइफाइड कॅन्सर इत्यादी आजारांमध्ये आपल्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते,तरी डॉक्टर निदान करून सांगतात की, तुम्हाला यांना प्लेटलेट द्यावा लागेल.हिमोग्लोबिन,प्लाझ्मा प्रमाणे प्लेटलेट्स हा देखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं महत्त्वाचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच आकाराने चपटे असल्यामुळे एखाद्या प्लेट प्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.

रक्तामध्ये प्रामुख्याने तीन घटक असतात- लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी), प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठ्या हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशी पासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारण पणे ५-९ दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

प्लेटलेट्सचं कार्य

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते. एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्या मधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

प्लेटलेट्सची संख्या

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या १.५ लाख ते ४.५ लाख असते. संख्या प्रमाणा पेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्या मध्ये अडथळा निर्माण झाल्यास, शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणा पेक्षा कमी झाल्यास शरीराच्या कुठल्याही भागातून रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरड्या मधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं

◆ डेंग्यू, मलेरियाचा ताप◆ अनुवंशिक आजार◆ केमोथेरपीडेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे २-३ दिवसांचा ताप आल्यास, त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाय योजना करावी.

प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास

◆ लसूण खाऊ नये.◆ अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.◆ अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅग सारखी औषधे घेऊ नयेत.◆ दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.◆ सुऱ्या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.◆ बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.◆ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत. प्लेटलेट्ससाठी गोळ्या किंवा औषधंही नाहीत. पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी

◆ जर शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका, कारण तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.◆ शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट १५० हजार ते ४५० हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट १५० हजार प्रती मायक्रोलीटर पेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते.◆ काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्या नंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

नैसर्गिक आहार

◆ पपई : पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईच्या ताज्या पानांचा रस गुळवेलाचे काडी ४ चमच सोबत देऊ शकता.

गुळवेल : गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्या मध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्या नंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

◆ आवळा : प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्या मध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन-सी प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी ३-४ आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूस मध्ये मध टाकून हे मिश्रण घेऊ शकता.

◆ भोपळा : भोपळा कमी प्लेटलेट कांउट मध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन-ए ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिका मध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूस मध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

◆ पालक : पालक व्हिटॅमिन-के चा चांगला स्रोत असून अनेक वेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन-के योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंग साठी आवश्यक आहे. अशा प्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये ४ ते ५ पालकाची ताजी पानं थोडा वेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्या नंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

◆ नारळ पाणी : शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

◆ ७) बीट : बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन-तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button